पीएन पाटील म्हशाखेत्री यांच्या वाढदिवसाच्या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
किसान विद्यालय जेप्रा येथे दिनांक 21/08/ 2024 ला संस्थेचे अध्यक्ष मा. पीएन पाटील म्हशाखेत्री यांच्या ८३ व्या वाढदिवसा प्रित्यर्थ विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, यात रक्षाबंधन, वृक्षाबंधन, वृक्षारोपण तसेच गीत गायनाचा कार्यक्रम घेऊन आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य मुकुंद म्हशाखेत्री यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विलास मेश्राम अरविंद ऊरकुडे, विनोद गोबाडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, तसेच ५ ते 12 च्या इयत्तेतील विद्यार्थ्यांना कार्यक्रमानंतर अल्पोपहार देण्यात आला. क्रिडाविभाग,स्काऊटगाईड, समाजसेवा, हरीत सेना चमुंनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परीश्रम घेतले,याप्रसंगी विद्यालयाचे शिक्षक गुरुदेव चापले,मिना म्हशाखेत्री,खुशाल दुमाने, विनोद म्हशाखेत्री, सचीन म्हशाखेत्री , सुरेश टेकाम,मनोहर निकुरे,पुष्पा मेश्राम,हजर होते. कार्यक्रमाचे संचालन चंद्रसेन खोब्रागडे तर आभार ऊज्वला तायडे यांनी केले.



