*तालुकास्तरीय विज्ञान नाटोत्सव स्पर्धा संपन्न*
सावली: शरदचंद्र पवार विद्यालय, व्याहाड खुर्द येथे 8 जुलैला तालुका स्तरीय विज्ञान नातोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 12 विद्यालयानी सहभाग घेतला.
सर्व सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले नंतर रीतसर कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले . पुष्पगुच्छ देउन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले .कार्यक्रमाचे उद्धाटन मोरेश्वर बोंडे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती सावली यांनी केले. अध्यक्ष स्थान प्रशांत गाडेवार यांनी भूषविले.
संचालन संजय झाडे
साधनव्यक्ती ग सा के सावली
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. किशोर बारसागडे शिक्षण विस्तार अधिकारी बीट व्याहाड खुर्द पंचायत समिती सावली यांनी केले . उद्घाटनीय भाषण श्री. मोरेश्वर बोंडे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती, सावली यांनी केले तर अध्यक्षीय भाषण श्री.प्रशांत गाडेवार प्राचार्य शरदचंद्र पवार विद्यालय, व्याहाड खुर्द यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रथम सत्राचे संचालन संजय झाडे तर आभार प्रदर्शन प्रमोद भोयर साधन व्यक्ती गट साधन केंद्र सावली यांनी केली .
प्रथम क्रमांक :- शरदचंद्र पवार विद्यालय, व्याहाड खुर्द द्वितीय क्रमांक :- रमाबाई आंबेडकर विद्यालय, सावली तृतीय क्रमांक :- जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, पाथरी
यांनी पटकविला.
विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
शरदचंद्र पवार विद्यालय व्याहाड खुर्द यांनी सर्व स्पर्धक ,पाहुणे मंडळी यांना जेवण देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
अशाप्रकारे तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धा अतिशय आनंदात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. नित्यानंद रामटेके साधन व्यक्ती , श्री. बंडू भेले विशेष शिक्षक, श्री. अमोल भोयर विशेष शिक्षक तथा शरदचंद्र पवार विद्यालय, व्याहाड खुर्द चे प्राचार्य व टीमने सहकार्य केले .