*राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय सावली येथे डाँ. चंद्रमौली पुर्ववत रूजु*
*प्राचार्य पदाचा कार्यभार स्विकारला*
सावली : भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली द्वारा संचालीत राष्ट्रपिता महात्मा गांधी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सावली येथील प्राचार्य पदावर डाॅ. ए. चंद्रमौली आज पासुन पुर्ववत रूजू झालेे. प्राचार्य डाॅ. चंद्रमौली यांची गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे मानव विज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता पदावर नियुक्ती झाल्याने भारत शिक्षण प्रसारक मंडळाने डाॅ. चंद्रमौली यांना जूलै 2022 पासून धारणाधिकार अन्वये गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे रूजू होण्यास कार्यमुक्त केले होते. नुकताच डाॅ. चंद्रमौली यांचा धारणाधिकार कालावधी संपुष्टात आल्याने डाॅ. चंद्रमौली यांनी 16 जूलै 2024 रोजी सावली येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सावली येथे प्राचार्य पदावर पुर्ववत रूजू होवुन कार्यभार स्विकारला आहे . एका छोटेखानी कार्यक्रमात मंडळाचे सचिव राजाबाळ संगीडवार यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी कार्यकारी प्राचार्य डाॅ. अशोक खोबरागडे आणि शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद उपस्थित होते. महाविद्यालयाच्या आजपर्यंतच्या प्रगतीमध्यें मंडळाच्या पदाधिका-यांसोबतचं डाॅ. चंद्रमौली यांचा सिंहाचा वाटा आहे. शिस्तप्रिय, अनुभवी आणि अभ्यासु व्यक्तीमत्व असलेले डाॅ. चंद्रमौली प्राचार्य पदावर पुर्ववत रूजू झाल्याने कर्मचारीवृंदानी स्वागत केले असून विद्यार्थ्यांमध्यें आनंदाचे वातावरण पसरले आहे.