*भिमणी येथे गुणवंतांचा सत्कार सोहळा संपन्न*
*सत्य साई सेवा समितीचा प्रेरणादायी उपक्रम*
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिमनी च्या प्रांगणात ता. 6 ला सत्य साई सेवा समिती गोंडपिपरी च्या वतीने दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ .पपीता विनोद तोडसाम सरपंच ग्रा.पं. भिमणी, उदघाटक म्हणून श्री. संजय तन्नीवार जिल्हा सेवा समन्वयक चंद्रपूर, तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री रंजीत पिंपळशेंडे उपसरपंच ग्रा.पं. भिमणी, सौ.ज्योतीताई फरकडे सदस्य ग्रा.पं.भिमणी, श्री.विजय मंगळगिरीवार जिल्हा आय.टी. समन्वयक, श्री. नरेंद्र गणमुक्कलवार गोंडपिंपरी तालुका समिती निमंत्रक, डॉ. निलावार, श्री. बबनराव तितरमारे मेडिकल इन्चार्ज, श्री.रवि कोसरे, श्री. विभाकर चौधरी, सोनापूर देशपांडे, चौधरी मॅडम सोनापूर देशपांडे, श्री.देवराव वांढरे, श्री.उद्धवराव चुधरी वढोली, श्री. जानकीराम इटकलवार अध्यक्ष तंटामुक्त समिती भिमणी, श्री.मन्सरामजी गेडाम भिमनी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.रामटेके मॅडम, विशेष शिक्षक श्री. गुडपले सर, सौ. गेडेकर मॅडम, मथुराबाई दुधकोहर यांची विचारमंचावर प्रामुख्याने उपस्थिती होती.
कार्यक्रमामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांसोबतच भिमणी येथील आदर्श शेतकरी श्री. नानाजी पा. पिंपळशेंडे, श्री. सुभाष पा. काळे, तसेच कृषी पदवीधर कु. समीर सोनू इष्टाम यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला, त्यानंतर जि.प. शाळेच्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आणि वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. दिनेश वांढरे, शांताबाई चुधरी, वढोली , श्रीमती संगीता सोनटक्के, श्री. हेमराज वांढरे, सौ.ताराबाई काळे, या सेवादलानी अथक परिश्रम करून हा कार्यक्रम यशस्वी केला. कार्यक्रमाला गावातील महिला व पुरुषांची उल्लेखनीय उपस्थिती होती. आभार प्रदर्शन श्री. संजय तन्नीरवार जिल्हा सेवा समन्वयक यांनी केले तर सूत्रसंचालन प्रकाश काळे सर माजी केंद्र प्रमुख यांनी केले.