संवर्ग विकास अधिकारी कुणाल उंदिरवाडे, यांच्यावर गुन्हा दाखल

संवर्ग विकास अधिकारी कुणाल उंदिरवाडे, यांच्यावर गुन्हा दाखल,
अश्लिल शिवीगाळ करुन मानसिक त्रास देत असल्याने कर्मचाऱ्यांचे कालपासून कामबंद आंदोलन सुरु,
विदर्भ 24 न्यूज़
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली/
सिरोंचा:- आज रोजी सिरोंचा येथील पंचायत समिती कार्यालयात कार्यरत कर्मचाऱ्यांना अश्लिल शिवीगाळ करुन त्यांना मानसिक त्रास देत असल्याबद्दल सहायक प्रशासन अधिकाऱ्याच्या तक्रारीवरुन सिरोंचा पोलिसांनी तेथील पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी कुणाल उंदिरवाडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. संवर्ग विकास अधिकारी कुणाल उंदिरवाडे हे अश्लिल शिवीगाळ करुन मानसिक त्रास देत असल्याने सिरोंचा पंचायत समितीतील कर्मचाऱ्यांनी कालपासून कामबंद आंदोलन सुरु केले आहे. अशातच काल पंचायत समितीचे सहायक प्रशासन अधिकारी सुधाकर निमसरकार यांनी सिरोंचा पोलिस ठाण्यात कुणाल उंदिरवाडे यांच्याविरोधात तक्रार केली. १६ जूनला पंचायत समितीतील कनिष्ठ अभियंता बी.व्ही.शेडे यांनी आपल्याकडे किरकोळ रजेचा अर्ज टपालाद्वारे आणून दिला.त्यानंतर तो अर्ज आपण मार्किग करुन आस्थापना शाखेकडे पाठविला.काही वेळाने बीडीओ कुणाल उंदिरवाडे यांनी आपणास त्यांच्या कक्षात बोलावून दुसऱ्या कर्मचाऱ्यांसमक्ष आपणास व बी.व्ही.शेंडे यांना अश्लिल शिवीगाळ केली. यामुळे आपली मानसिक स्थिती बिघडली.असे श्री.निमसरकार यांनी तक्रारीत म्हटले आहे. उंदिरवाडे हे १३ ऑगस्ट २०१ ९ पासून सिरोंचा पंचायत समितीत गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. ते रुजू झाल्यापासून कर्मचाऱ्यांना अशासकीय भाषेत शिवीगाळ करतात, कर्मचाऱ्यांना क्षुल्लक चूक असताना पोलिसांत तक्रार करण्याची तसेच निलंबनाची धमकी देतात यामुळे अनेक कर्मचाऱ्यांचे मानसिक आरोग्य बिघडले आहे, असेही श्री.निमसरकार यांनी तक्रारीत म्हटले आहे. बीडीओ उंदिरवाडे यांनी आजपर्यंत कोणत्या कर्मचाऱ्यांना कसा त्रास दिला , याविषयीही श्री.निमसरकार यांनी तक्रारीत विस्तृत उल्लेख केला आहे. या तक्रारीवरुन सिरोंचा पोलिसांनी बीडीओ कुणाल उंदिरवाडे यांच्याविरोधात भादंवि कलम २९४,५०४,५०६,५०७ अन्वये गुन्हा दाखल केला असून.पोलिस निरीक्षक अजय अहिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विशाल जाधव प्रकरणाचा तपास करीत आहेत .