राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
सावली: राष्ट्रपिता महात्मा गांधी कला, वाणिज्य , विज्ञान महाविद्यालय सावली येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग व शारीरिक शिक्षण विभागांच्या वतीने दि 21 जून 2024 ला आतंरराष्ट्रीय योग दिन महाविद्यालय परिसरात आयोजित करण्यात आले यावेळी योग मार्गदर्शक म्हणून प्रा. दिलीप सोनटक्के व प्रा. दिपिका गुरनुले यांनी योग प्रात्यक्षिक सादर करुन योगाचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. अशोक खोब्रागडे यांनी निरामय जीवनासाठी योग महत्त्वपूर्ण असून योगाच्या माध्यमातून शारीरिक तसेच मानसिक आरोग्य लाभत असते तरी नियमित योग करण्यात यावे असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा देवीलाल वाताखेरे , डॉ. विजयसिंग पवार शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ.भास्कर सुकारे यांनी सहकार्य केले यावेळी प्राध्यापक तथा शिक्षकशिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.