*शहीद सुरेश पाटिल सुरकर विद्यालयाचा 93.93 टक्के निकाल*
*शहीद सुरेश पाटिल सुरकर विद्यालय कवठी चा 93.93 टक्के निकाल*
👉 *कोमल दिपक घोटेकार विदयालयातून प्रथम*
कवठी प्रतिनिधी (राकेश घोटकार):- सावली तालुक्यातील कवठी येथील शहीद सुरेश पाटिल सुरकर विद्यालयाचा माध्यमिक शालांत परिक्षेचा निकाल 93.93 टक्के लागला.कोमल दिपक घोटेकार ही विदयार्थीनी 83.20 टक्के गुण घेत विद्यालयातून प्रथम येण्याचा बहुमान मिळविला.विदयालयाचे तीन विदयार्थी विशेष प्राविण्यासह,अकरा विदयार्थी प्रथम श्रेणीत,नऊ विदयार्थी द्वितीय श्रेणीत तर आठ विदयार्थी तृतीय श्रेणीत पास झाले.33 पैकी 31 विदयार्थी पास झाले.
आदिशा विकास भोयर आणि गुंजन छत्रपती नरूले या दोन्ही विदयार्थीनी विशेष प्राविण्यासह पास झाल्या.त्यांना 75.40 टक्के गुण मिळाले.श्वेजल विलास घोटेकार हिला 73 टक्के, मिळवत तिसरा क्रमांक पटकविला .पायल गोहणे या विदयार्थीनीने मराठी विषयात 100 पैकी 91 गुण मिळवले.मराठी,हिंदी आणि इंग्रजी या भाषेच्या विषयाचा निकाल उत्कृष्ट लागला. विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीत पास झालेल्या सर्व विदयार्थ्यांचे मुख्याध्यापक के.व्ही.खोब्रागडे यांच्या हस्ते घरोघरी जावून अभिनंदन करण्यात आले.पुष्पगुच्छ आणि मार्कशिटची प्रिंट कॉपी त्यांना देण्यात आली.यावेळी सहा.शिक्षक व्हि.डी.हजारे,वि.ओ.रेकलवार,एम.एन.डोंगरे,कु.एल.के.सलामे,एल.आर.तांगडे,जे.एल.वनकर,एस एम.ठाकूर,एस.एम.टेप्पलवार उपस्थित होते.सर्व गुणवंत विदयार्थ्यांचे शहीद सुरेश पाटिल सुरकर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष चिंतामण पाटिल तिमाडे,सचिव तुकाराम पाटील सुरकर तथा सर्व संचालक मंडळानी अभिनंदन केले. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी विद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखल्याने कवठी येथिल सरपंच कांताबाई बोरकूटे,उपसरपंच राकेश घोटेकार,ग्रामपंचायत सदस्य, तंमुस अध्यक्ष टिकाराम म्हशाखेत्री, पोपा सचिन सिडाम विनोद धोटे गुरूदेव सेवा मंडळ कवठीचे पदाधिकारी, प्रतिष्ठीत नागरिक तसेच कवठी,पारडी आणि रूद्रापूर येथिल गावक-यांनी विदयालयाच्या उत्कृष्ट निकालाबद्दल विशेष कौतूक केले .