किसान विद्यालयाची उज्ज्वल विजयाची परंपरा कायम
*विद्यालयाचा Hsc Board निकाल* *९३.९४%.*
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने दिनांक २१ मे रोजी जाहीर करण्यात आलेल्या १२ वी निकालात जेप्रा येथिल किसान उच्च माध्यमिक विद्यालयाने उज्वल निकालाची परंपरा कायमच राखली आहे. येथील बारावी चा निकाल ९३.९४ टक्के लागला असून विद्यालयातून प्रथम श्रेणीत – १३ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत – १६ विद्यार्थी तसेच तृतीय श्रेणीत – ०२ विद्यार्थी पास झालेत. विद्यालयातील ३३ विद्यार्थ्यांपैकी ३१ विद्यार्थी पास झालेत. त्यात कु. धनश्री श्रावण गुरनुले ७०.०० % गुण मिळवून प्रथम, कु. प्रियंका हरिदास गावतुरे ६६.६७ % गुण मिळवून द्वितीय तर कु. नयना तुळशीराम आदे हिने ६५.५० % गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री. पी. एन.पाटील म्हशाखेत्री, उपाध्यक्ष श्री. परशुराम पाटील म्हशाखेत्री, सदस्य श्री विश्वनाथजी निकुरे तसेच विद्यालयाचे प्राचार्य श्री मुकुंद मशाखेत्री, प्रा. विनोद म्हशाखेत्री, प्रा. सचिन म्हशाखेत्री प्रा. तिलेश मोहुर्ले तसेच सर्व शिक्षक वृंदांनी अभिनंदन करून विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्यास मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.