*वादळाने टिनाचे शेड कोसळले
सविस्तर वृत्त असे की दिनांक २१/०५/२०२४ रोज मंगळवारला रात्रौ खूप जोराचा वादळ वारा आला त्या वादळाची तीव्रता अधिक असल्याने जिल्हा प. उच्च प्राथमिक शाळा जेप्रा येथील दोन खोल्यातिल शेड कोसळून पडल्याने जवळपास 3 लाख रुपयाचे आर्थिक नुकसान झाले आहे,यात कोणतीच जीवित झाली नाही पण दोन्ही खोल्यातील राप्टर, पारापेठ, व टीनाचे शेड याची नुकसान झाली आहे
प्रत्यक्ष पाहणी केल्यास वरील बाब सत्य असून सर्वांच्या समक्ष पंचनामा करण्यात आले आहे. पंचनामा करते वेळी गावातील प्रथम नागरिक शशिकला ताई झंजाळ सरपंच ग्रा. पं जेप्रा विनोद चुनारकर , उषाताई गावतुरे शाळा व्यवस्थापण समिती अध्यक्ष ,पुरुषोत्तम बावणे,घनश्याम गावतूरे, मनोज भांडेकर, प्रमोद मेश्राम,सुरेश नरुले, गुणाजी देशमुख
बाळकृष्ण नेताम ,जगदिश चुदरी , धनंजय चूनारकर , श्रीमती अरुणा गुणवंत जंबेवार, पिंपळकर सर, कोटरंगे सर, हर्षे मॅडम, केंद्र प्रमुख, एस. जी. बांबोळकर सर कें.प्र. आंबेशिवणी, ओमदेव आदे सर
मुख्याध्यापक (उ.प्र.) जि.प.उच प्रा.शाळा जेप्रा. आणि गावातील बरेच नागरिक उपस्थित होते. पंचायत समिती गडचिरोलीच्या कर्मचाऱ्यांनी स्वतः पाहणी करून आर्थिक नुकसान भरपाई करावी अशी मागणी जेप्रा गावातील नागरिकांची आहे



