*पिसाळलेल्या कुत्र्याने सावली शहरात घातले थैमान*
*12 लोकांचा तोडला लचका*
सावली शहरात पिसाळलेल्या कुत्र्याने तिन दिवसांत 12 लोकांना चावा घेतला आहे. शहरांतील चौका चौकात पिसाळलेल्या कुत्र्याने थैमान घातले आहे. लहानापासून म्हाताऱ्या माणसांना चावा घेतल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
यामध्ये सुमन गोविंदा भोयकर, वय 78 सुरज रामचंद्र निकुरे वय 12, नंदकिशोर निर्मल राऊत वय 52, सावी लक्ष्मण दुधे वय 14, श्वेता शंकर भंडारे वय 32, संगीता गजानन शेटपल्लीवार वय 55, आर्यन संतोष शिंदे वय 10, मनोहर प्रशांत भंडारे वय 32, सचिन बाबुराव साव वय 35, माही व्यंकटेश मोहुर्ले वय 07, व्यंकटेश पी. मोहूर्ल वय 36, वच्छालाबाई वासुदेव दुधे वय 70 अशा एकूण 12 लोकांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला आहे.
किरकोळ जखमींना सावलीच्या ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले तर गंभिर जखमींना सामान्य रुग्णालय गडचिरोलीला पाठविण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ ऋषिकेश देखमुख, वैद्यकीय अधिक्षक डॉ बंडू रामटेके यांच्या मार्गदर्शनात उपचार सावली ग्रामीण रुग्णालयात सुरु आहे.
मागील दोन दिवसांपासून नगर पंचायत कर्मचारी पिसाळलेल्या कुत्र्याचा पाठलाग करीत आज सायंकाळी सहा वाजता कर्मचाऱ्यांना पिसाळलेल्या पकळण्यात आणि ठार कऱण्यात यश आले. पिसाळलेल्या कुत्र्याचा पाठलाग करायला नगर पंचायत कर्मचाऱ्यांना नाकी नव आले.
सावली शहरात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी अनेक लहान बालकांना चावा घेतला आहे परंतू प्रत्येक वेळी नगर पंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. सावलीच्या पत्रकारांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना सुध्दा ही गोष्ट पत्रकार परिषदेत सांगितली मात्र याकडे नगर पंचायत पदाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. नगर पंचायत विरोधात जनमानसात रोष दिसून येत आहे.