दिव्यांग विदयार्थ्यांकरीता होम थेरपी किटच्या वापराबाबत एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन*
सावली(प्रा.शेखर प्यारमवार)
पंचायत समिती,सावली येथे समावेशित शिक्षण या उपक्रमांतर्गत Intergrated Support ची आवश्यकता असलेल्या दिव्यांग विदयार्थ्यांना दैनंदिन कौशल्य विकसित करण्याकरिता Interreted CWSN Kit / Home Therapy Kit उपलब्ध करुन देणेकरीता माहे 25 सप्टेंबर 2023 ला रमाबाई आंबेडकर विद्यालय, सावली येथे एक दिवसीय मुल्यमापन शिबिराचे आयोजन करण्यात आले.स
सदर मुल्यमापन शिबिरामध्ये जिल्हा रुग्णालय,चंद्रपूर येथिल फिजियोथेरेपीस्टव्दारे फिजोथेरपी करुन त्यांना आवश्यक असणा-या साहित्याची मागणी वरीष्ठ कार्यालयाकडे करण्यात आली. विदयार्थ्यांच्या गरजे नुसार साहित्य गट साधन केंद्र-पंचायत समिती,सावली येथे प्राप्त झाले असुन दिनांक 17 मे 2024 ला जि.प.प्राथमिक शाळा क्रमांक 2 येथे होम थेरपी किटच्या वापराबाबत एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.
सदर प्रशिक्षणाला अध्यक्ष म्हणुन मान.श्री मोरेश्वर बोंडे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती,सावली,प्रमुख अतिथी म्हणुन मान.श्री जगन्नाथ वाढई केंद्र प्रमुख,केद्र सावली/जिबगाव तथा श्री किशोर बनकर व ब्रम्हानंद कोवे उपस्थित होते.
प्रशिक्षणाची सुरुवात दिव्यागांचे प्रेरणास्थान लुईस ब्रेल यांच्या प्रतिमेला पुष्पमाळ अर्पण करुन करण्यात आली.कार्यक्रमाची प्रस्तावणा कु.सुनंदा काकडे समावेशित तज्ज्ञ यांनी करुन कार्यक्रमाची रुपरेषा स्पट केले.मान गटशिक्षणाधिकारी यांनी आपल्या मनोगनामध्ये दिव्यांग विदयार्थ्याच्या बाबतीत मार्गदर्शन करुन नियमित विदयार्थ्यांना जस शिकण्याचा अधिकार आहे तसेच दिव्यांग विदयार्थ्यांना पण शिकण्याचा अधिेकार आहे.दिव्यांग मुल जन्माला येण हि नैसर्गिक प्रक्रिया आहे.त्याच्या गरजे नुसार सोई सुविधा पूरविणे आणि गरजे नुसार मार्गदर्शन करणे हे शिक्षकांचे तसेचे समाजाचे काम आहे.शासन स्तरावरुन पुरविण्यात येणा-या सर्व योजना व सवलती त्यांना वेळोवळी मिळाव्या या करीता समावेशित शिक्षण अंतर्गत प्रयत्न केल्या जातात.प्रमुख अतिथी श्री वाढई सर यांनी सुध्दा दिव्यांग विदयार्थी यांचे वर प्रकाश टाकुन पालक म्हणुन आपल्या पाल्याची कसी देखभाल करता येईय यावर मार्गदर्शन केले.
उपस्थित पालकांना होम थेरपी किटच्या वापराबाबत व त्याच्या योग्य काळजी बाबत सविस्तर मार्गदर्शन समावेशित तज्ज्ञ कु.प्रिया गोडघाटे आणि विशेष शिक्षक प्रज्ञापाल बन्सोड यांनी केल. सर्व लाभार्थी विदयार्थ्यांना साहित्य वितरण करण्यात आले.श्री बंडु भेले विशेष शिक्षक यांनी कार्यक्रमाचे संचालन तर अमोल भोयर विशेष शिक्षक यांनी आभार मानले. सदर प्रशिक्षणाच्या यशस्वीकरीता गट साधन केंद्र सावली चे विषय साधनव्यकती नित्यानंद रामटेके,प्रमोद भोयर,संजयकुमार झाडे,कु बबीता चहांदे व रोखपाल जिवण गुरुनुले यांनी मोलाचे सहकार्य केले.