मुख्य कार्यकारी अधिकार्यांची व्याहाड बुज ग्रामपंचायतीला भेट

आज दिनांक 16 में ला .डाॅ.सुभाष पवार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर ,यांनी ग्रामपंचायत व्याहाड बुज येथे भेट देऊन ग्राम पंचायत विकास कामाचा आढावा घेण्यात आला. 15 वा वित्त आयोग, घरकुलाचा आढावा, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीची पाहणी करण्यात आली व तात्काळ काम पुर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
ग्राम पंचायतने बांधकाम केलेल्या घन कचरा व्यवस्थापन अर्तगत सेगरीगेशन शेडच्या कामाची पाहणी व घनकचरा आणि सांडपाणी स्थानिक स्वयंसहायता गटाकडे देण्यात यावी अशा सूचना दिल्या. तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत बोडी खोलीकरण कामास भेट देऊन मजुराशी चर्चा करण्यात आली.
त्यावेळी वासनिक गटविकास अधिकारी सावली, तेलकापल्लीवार सहा.ग.वि.अ. पंचायत समिती सावली,
परसावार विस्तार अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी चौधरी.साखरे, कविता रविंद्र बोलीवार सरपंच व्याहाड बूज. परशूराम भोयर उपसरपंच, मसराम सचिव, जनार्धन गुरणुले सदस्य, भक्तदास आभारे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, प्रतिभा भरडकर तांत्रिक सहाय्यक,.प्रतीक्षा गेडाम प्रणिता विनोद तोडेवार, रुपाली नरेश करकाडे, तसेच ग्रामपंचायत मधील इतर मान्यवर ग्राम पंचायत व्याहाड बूज.सदर भेटीच्या वेळी उपस्थित होते