सोसाट्याच्या वाऱ्याने उन्हाळी धान पिकाचे नुकसान*
सावली: सावली तालुक्यात सर्वत्र सोसाट्याच्या वाऱ्याने हजेरी लावली असून दिनांक 12 में दुपारी 3 वाजता पासुन वादळ वाऱ्यामुळे उष्णतेचा उच्चांक घटला मात्र शेतकऱ्याच्या उन्हाळी धान पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
सावली तालुक्यात शेकळो हेक्टर शेती ही धानपिकाची आहे. येथे बऱ्याच प्रमाणात धानाची लागवड केली जाते. वैनगंगा नदीच्या वरदानाने नदी परिसरातील जमिनीत मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने हा धानपिकाचा पट्टा म्हणून प्रसिद्ध आहे. नदीलगत गाव पारडी, कवठी, रुद्रापुर, चारगाव, भरपायली, सादागड, सादागड हेटी, पाथरी, पालेबारसा नदी लगत गावासह अन्य गावातही उन्हाळी धानपिकाची लागवड केली जाते.
सद्या उन्हाळी धान कापनीचा हंगाम सुरू आहे तर काही शेतकऱ्यांचे धान कापलेले आहेत मात्र अचानक आलेल्या अवकाळी वादळ वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे. शेतातील उभे असलेले धानाचे कळप आडवे झाल्यानें शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. अवकळी आलेल्या वादळ वाऱ्यामुळं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी बळीराजाची मागणी आहे.