Vidarbh24News

Latest Online Breaking News

 नगरसेवक सतीश बोम्मावार यांच्या कडून पाणपोईची सुरुवात*

नगरसेवक सतीश बोम्मावार यांच्या कडून पाणपोईची सुरुवात*

*सभापती प्रीतम गेडाम यांच्या हस्ते उदघाटन*

सावली(तालुका प्रतिनिधी)
उन्हाळ्यात नागरिकांना पिण्याच्या थंड पाण्यासाठी सद्या वणवण लक्षात घेता मार्गावरील प्रवाशांना थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यासाठी सावली येथील नगरसेवक तथा गटनेता सतीश बोम्मावार यांनी पुढाकार घेत थंड पाण्याची पाणपोई चंद्रपूर-गडचिरोली मुख्य मार्गावरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या बाजूला आज दिनांक 1 मे महाराष्ट्र दिनापासून सुरुवात केली.
या पाणपोई चे सावली न.पं. चे या प्रभागातील नगरसेवक तथा पाणी पुरवठा सभापती प्रीतम गेडाम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी नगरसेवक तथा गटनेता तथा भाजपा तालुका महामंत्री सतीश बोम्मावार,माजी नगरसेवक चंद्रकांत संतोषवार,युवा नेता गौरव संतोषवार, युवा नेता निखिल सुरमवार,वंचित बहुजन आघाडी चे शहराध्यक्ष रोशन बोरकर,भाजपा सावली शहराध्यक्ष आशिष कार्लेकर,महेंद्र थोरात, अमोल दुधे,प्रसाद जक्कुलवार, आशिष संतोषवार,राहुल लोडेल्लीवार,पद्माकर डोंगरे,धर्मेश बोरकर,राजेश रापेलीवार,सौरभ गोहणे,भाग्यवान घोनमोडे, चक्रपाणी दुधे,रोशन डोहणे,अशोक दुर्गे,जोगेंद्र गोवर्धन,उत्तम कोसनकर आदी जण यावेळी उपस्थित होते.
यावेळी अनेकांनी नगरसेवक सतीश बोम्मावार यांच्या पाणपोई च्या कार्याला शुभेच्छा दिल्या.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!
preload imagepreload image
13:19