*जि.प. प्राथमिक शाळा भिमणी येथे शाळा पूर्वतयारी मेळावा मोठ्या उत्साहात साजरा*

भिमनी: शनिवार दिनांक 27 एप्रिल 2024 रोजी जि. प. उच्च प्राथमिक शाळा भिमणी येथे शाळा पूर्वतयारी मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम शिक्षणाच्या जननी माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व मालार्पन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर कृती पत्रिका व गुणवत्तेकडे पहिले पाऊल या पुस्तिकेतून विद्यार्थ्यांना पालकांनी कसे मार्गदर्शन करावे याबद्दल विस्तृत माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका मा. कु. रजनी रामटेके मॅडम यांनी केले.
सर्व नवीन भरतीपात्र विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसोबत पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी शाळेच्या प्रांगणात विविध प्रकारचे स्टॉल्स लावण्यात आले होते यामध्ये प्रत्येक स्टाॅलवर उपस्थित असलेल्या विद्यार्थी प्रतिनिधीद्वारे भाषा विकास, गगनपूर्व तयारी, सामाजिक व भावनिक विकास, बौद्धिक क्षमता, शारीरिक क्षमता याबद्दल कृती घेउन विद्यार्थ्यांमध्ये शाळा व शिक्षण याविषयी आवड निर्माण करण्याचे कार्य याप्रसंगी सर्व विद्यार्थी प्रतिनिधी, शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापक यांच्या माध्यमातून करण्यात आले. यावेळी भिमणीचे उपसरपंच मा.रणजीतभाऊ पिंपळशेंडे, शा.व्य.समितीचे अध्यक्ष मा. संतोष दुधकोहर, केंद्रप्रमुख मा. तामगाडगे सर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मा.जानकीरामजी ईटकलवार, माहिती अधिकार व पोलीस मित्र मा. चंद्रहास ईटकलवार, पालक प्रतिनिधी मा. देवानंद राऊत, शाळेचे स. शिक्षक मा. संतोष गुडपल्ले सर, मा. किशोर शेडमाके सर, तथा विशेष म्हणजे पालक व माता पालक यांची लक्षणीय उपस्थिती होती. प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका कु. रजनी रामटेके मॅडम यांनी तर सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन स. शिक्षीका कु. संजीवनी गेडेकर मॅडम यांनी केले.