Vidarbh24News

Latest Online Breaking News

*मराठा आरक्षण सर्वेक्षण मानधनातील तफावत दूर करण्याची मागणी

*मराठा आरक्षण सर्वेक्षण मानधनातील तफावत दूर करा*

सावली (शेखर प्यारमवार)

संपूर्ण महाराष्ट्रात दिनांक २३ जानेवारी २०२४ ते ३१ जानेवारी २०२४ या कालावधीमध्ये मराठा आरक्षणाचे कुटुंबनिहाय सर्वे करण्यात आले होते,त्यामध्ये तहसीलदार यांचे अधिनस्त तालुक्यातील सर्व विभागातील कर्मचाऱ्यांची प्रगणक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यामध्ये तहसीलदार यांचे अधिनस्त तालुक्यातील सर्व विभागातील कर्मचाऱ्यांची प्रगणक म्हणून नियुक्ती करण्यात आली मराठा आरक्षण सर्वेक्षणाची दिलेली जबाबदारी अतिशय चोखपणे आणि दिलेल्या वेळेच्या मर्यादेमध्ये पाडली. परंतु प्रगणकाने केलेल्या कुटुंब सर्वेक्षण संख्येमध्ये प्रचंड प्रमाणात तफावत दिसून येत आहे. प्रत्यक्षात सर्वेक्षण केलेले कुटुंब संख्या आणि कार्यालयामार्फत प्रकाशित केलेल्या यादीतील कुटुंब संख्या यांचा ताळमेळ जुळत नसल्याचे आढळून येत आहे राज्य मागासवर्गीय आयोगाद्वारे प्रकाशित केलेल्या परिपत्रकानुसार नमूद केल्याप्रमाणे मानधन १०००० रुपये आणि प्रवास भत्ता ५०० रुपये मिळणे अनिवार्य होते परंतु असे दिसून आले नाही. मराठा सर्वेक्षण पर्यवेक्षकाकडून प्रत्येक प्रगनकाने केलेल्या कुटुंब संरक्षणाची वस्तुनिष्ठ माहिती मागून घेऊन प्रत्येक प्रगणकास योग्य मोबदला देण्यात यावा यासाठी आज दिनांक २६ एप्रिल २०२४ ला सावली तालुका महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटने कडून तहसीलदार मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!