नवोदय विद्यालय प्रवेशासाठी दोन विद्यार्थीची निवड
*विश्वशांती विद्यालयाचे सुयश*
सावली(प्रा.शेखर प्यारमवार)
भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली द्वारा संचालित विश्वशांती विद्यालय सावली येथील सत्र २०२३- २०२४ सत्रात घेण्यात आलेल्या नवोदय विद्यालय समितीद्वारा २० जानेवारी २०२४ ला जवाहर नवोदय प्रवेश पात्रता परीक्षा घेण्यात आली. सदर परीक्षेमध्ये विश्वशांती विद्यालय सावलीचे दोन विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यात निखिल चरणदास मांदाळे आणि कु. जानवी विलास म्याकलवार यांनी सुयश प्राप्त केले.त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई – वडील,भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी,विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार,पर्यवेक्षक सुधाकर मेश्राम, विषय शिक्षक किशोर संगिडवार,प्रदीप कोहळे,वनिता गेडाम,वर्गशिक्षक राजेंद्र मांदाळे तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना दिले.सर्व कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
*बाईट*
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा उद्देश डोळ्यासमोर समोर ठेऊन आम्ही सर्व शिक्षक शाळेत काम करीत असतो.अगदी सत्राच्या सुरुवातीपासून नवोदय आणि शिष्यवृत्ती परीक्षेचे नियमितपणे वर्ग आमचे शिक्षक घेत असतात त्याचे फलित म्हणून आज दोन विद्यार्थी नवोदय पात्रता परीक्षेत निवड झाले.
रवींद्र मुप्पावार
मुख्याध्यापक
विश्वशांती विद्यालय सावली.



