*कवठी येथे हत्तीरोग निर्मूलनासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहीम*
कवठी प्रतिनिधी ( राकेश घोटेकर),
सावली तालु्क्यातील कवठी येथे सार्वजनिक आरोग्य विभाग महारा्ट्र शासन व जिल्हा आरोग्य विभाग यांच्या वतीने लहान बालकांसाठी जंतनाशक गोळ्या व हत्तीरोग निर्मुलनासाठी २६ मार्चपासुन विशेष मोहिम राबविणयात आली आहे
दरवर्षी हत्तीरोग निर्मुलनासाठी विशेष मोहिम राबविण्यात येते. मात्र काही नागरिक हत्तीरोग निर्मुलनासाठी दिलेल्या गोळ्या खात नाही. त्यामुळे त्या व्यक्तीला हत्तीरोग होण्याचा धोका असतो, त्यासाठी मंगळवार २६ मार्चपासून सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या वतीने कवठी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेमध्ये पहिल्या दिवशी लहान बलकांसाठी जंतनाशक गोळ्या व हत्तीरोग निर्मुलनासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली. शाळा आणि गावामध्ये सार्वत्रिक औषधोचार मोहिम राबविण्यात येत आहे यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. वनकर, सरपंच कांताबाई बोरकुटे, उपसरपंच राकेश घोटेकार, पोलीस पाटिल सचिन सिडाम आरोग्य सेविका जया मेंढळकर, साठे आशा सेविका संगीता गेडाम, प्रेमिला भोयर उपस्थित होते .
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जिप. शाळेच्या सर्व शिक्षकांनी मोलाची भूमिका बजावली.



