Vidarbh24News

Latest Online Breaking News

मुलीसह मातेची आत्महत्या

मुलाने हात झटकल्याने थोडक्यात बचावला

सावली – मुल येथिल कायमची रहिवासी असलेली आई तेरा वर्षांच्या मुलीला व अकरा वर्षांच्या मुलाला खेडी शेतशिवारात आत्महत्या करायला गेली. मुलाने हात झटकला व त्याने खेडी गावात पळ काढला त्यामुळे तो थोडक्यात बचावला.

मुल येथील रहि समीक्षा दिपक पेटकर वय 14 व साहिल पेटकर वय 11 हे खेडी येथे असलेल्या आपल्या शेतात आले. जवळच अमरदीप कोनपतीवार यांची विहीर आहे. त्या विहिरीजवळ जात मुलीला व मुलाला धक्का दिला. मुलगी विहिरीत पडली मात्र मुलाने तावडीतून सुटत खेडी गावाकडे पळ काढला व गावात जाऊन हकीकत सांगितली. गावापासून विहिरीचे अंतर फार असल्याने लोक येईपर्यंत बराच कालावधी लोटला. पती दिपक पेटकर वेल्डींगचे काम करतो. त्याची तीन एकर शेती खेडी शेतशिवरात आहे.

पोलिसांच्या मदतीने मायलेकीला काढून ग्रामीण रुग्णालय सावली येथे उपचारार्थ दाखल केले. परंतु डॉक्टरांनी मृत घोषित केले. आत्महत्येचे कारण समजले नसून पुढील चौकशी पोलीस निरीक्षक जीवन राजगुरू यांच्या मार्गदर्शनात सावली पोलीस करीत आहेत.

आत्महत्येपूर्वी फोन करून नातेवाईकांना दिली माहिती
आत्महत्येपूर्वी आपल्या नणंदेला फोन करून माझी शेवटची भेट आहे. त्यानंतर भेट होणार नाही असेही सांगितल्याची माहिती समोर येत आहे.

 

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!