*सुरज कांकलवार मानवसेवा पुरस्काराने सन्मानित

सावली: मराठा लाईफ फाउंडेशन व जीवन ज्योत ड्रॅगस् बँक, नशा मुक्ती केंद्र सिंधुताई सपकाळ व वच्छलाबाई लोखंडे यांच्या स्मृतीप्रितर्थ 2024 चा मानवसेवा पुरस्कार सन्मानित मराठा लाईफ फाउंडेशन चे अध्यक्ष किसन जी लोखंडे यांच्या हस्ते मुंबई येथे 20/2/2024 ला.सिंदोळा भूमितील मनोरुग्णांचाआधारवड दिव्यवंदना आधार फाउंडेशन मधे गेल्या दोन वर्षांपासून महान कार्य करित आहे. सुरज भाऊ कांकलवार व शुभम भाऊ पसारकर याना 2024 चा मानवसेवा पुरस्कार ने सन्मानित करण्यात आले. मराठा लाईफ फाउंडेशन ने सुरज भाऊ कांकलवार व शुभम भाऊ पसारकर हे युवक कोणतेही शासकीय अनुदान नसताना ही स्वता चंद्रपूर, गडचिरोली ,भंडारा ,गोंदिया,या जिल्ह्यामध्ये मोहीम राबवून रोडवरील बेघर, बेवारस ,अनाथ, निराधार ,मनोरुग्ण लोकांना निस्वार्थपणे सेवा देत आहे. शुभम ने कोरोना काळात त्यांच कोणी नाही अशा लोकांना आश्रय देत काहींचा उपचार केला. उपचारातून बरे झाले त्यांना घरी पोहोचण्याचे काम केलं गेल्या पाच वर्षापासून गरजू लोकांची सेवा करीत आहे. व सुरज कांकलवार हा गेल्या दोन वर्षांपासून दिव्यवंदना आधार फाउंडेशन येथे कार्य करीत महान कार्य करीत आहे. जामगाव कोमटी (भिसी) येथे जि.चंद्रपूर चंद्रपूर, गडचिरोली ,भंडारा, गोंदिया या चार जिल्ह्यातील रोडवरील बेघर,बेवारस, अनाथ, निराधार ,मनोरुग्ण लोकांनकरिता पहिले केंद्र बनत आहे. दिव्य वंदना आधार फाउंडेशन बळकट करा असे आवाहन सुरज भाऊ कांकलवार यांनी केले आहे.