‘समता संघर्ष समाज परिवर्तन संघटनेच्या वतीने शिवाजी महाराज जयंती साजरी
‘आम्ही वारस विचारांचे,वर्तन आमचे परिवर्तनाचे.’ हे ब्रीदवाक्य घेऊन अवघ्या एक महिन्यापूर्वी निर्माण केलेल्या ‘समता संघर्ष समाज परिवर्तन संघटना’ व अण्णाभाऊ साठे विचार मंचच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक १९फेब्रुवारी २०२४ला कन्यका सभागृह,गोंडपिपरी येथे भव्य दिव्य स्वरुपात शिवजयंतीचा कार्यक्रम माननीय किशोर प्रल्हादराव नगराळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.यामध्ये सुरुवातीला बुद्ध, शिवाजी,फुले,भीम गीतांचा बहारदार कार्यक्रम घेऊन वातावरण निर्मिती करण्यात आली.त्यानंतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला व शेवटी समाज प्रबोधन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माननीय राजेश कलगट्टीवार यांनी केले.उद्घाटक म्हणून गोंडपिपरीचे नगरसेवक तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मा.महेंद्रसिंग चंदेल होते,तर स्वागताध्यक्ष मा.लक्ष्मणराव मोहुर्ले साहेब होते.याप्रसंगी मा.नन्नावरे साहेब,मा.संदीप पोवरकर,मा. काशिनाथ देवगडे,मा.प्रा.हरिश्चंद्र नक्कलवार,मा.विजय देवतळे,अॅडव्होकेट फुलझेले मॅडम,कांबळे मॅडम,मा.दिगांबरजी लाटेलवार व समता संघर्ष समाज परिवर्तन संघटनेचे राज्याध्यक्ष मा. रुपेश वालकोंडे,मा.बबनरावजी गोरंतवार यांनी मौलिक मार्गदर्शन केले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन मा.धम्मराव तानादू यांनी केले,तर आभार प्रदर्शन मा.शेखर बोनगीरवार यांनी केले.
कार्यक्रमाला गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील बहुसंख्य स्री-पुरुष व युवक-युवती उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजक मा.राजेश कलगट्टीवार,मा.शेखर बोनगीरवार, लक्ष्मणराव मोहुर्ले व समता संघर्ष समाज परिवर्तन संघटनेचे गोंडपिपरी येथील स्थानिक चमुने सुंदर कार्यक्रमाचे आयोजन केले.
एकंदरीत ‘ आम्ही वारस विचारांचे, वर्तन आमचे परिवर्तनाचे’.या ब्रीदवाक्याला साजेशा या कार्यक्रमाचे पडसाद सर्वदूर उमटले.



