परिवर्तन ढोलताशा पथक सिंदेवाही उद्घाटन सोहळा
सिंदेवाही : कुणाल उंदीरवाडे
शहरातील तरुणाई सजविलेले परिवर्तन ढोलताशा ध्वज पथक सज्ज झाली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर बुद्ध विहार सिंदेवाही यांच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त ढोलताशा पथकाचा उद्घाटन समारंभ आंबेडकर चौक येथे आयोजित करण्यात आले होते. तरूणाईने सजविला परिवर्तन ढोलताशा पथकानी प्रात्यक्षिक करून दाखविले आहे.
शहरातील तरुणाई रस्त्यावर पुणे , मुंबई , नागपूर येथील ढोल ताशांच्या पथके असल्याचे नेहमीच दिसत होती. ग्रामीण भागातील सिंदेवाही ची तरुणाई सज्ज झालेली आहे. सर्वांनी मिळून 30 युवा वर्गाचे पथक तयार केले असून 10 महीलांचा समावेश आहे. या परिवर्तन पथकातील ढोल, ताशे व लागणारे महागडे तसेच विविध प्रकारचे सजावटीचे संपूर्ण साहित्य नवीन खरेदी केलेल्या आहेत. पथकाचे संचालन, सराव नियमित करीता रोज सकाळी दोन तास तसेच सायंकाळी दोन वेळ देऊन गावाचे बाहेरील भागात सराव सुरू केलेला होता. ग्रामीण भागातील तरुणाई रोजगाराचे शोधात विविध प्रकारच्या क्षेत्रात कलागुणांना वाव मिळेल याकरिता परिवर्तन ढोल ताशा ध्वज पथक निर्माण केलेल्या आहे. वर्षभरामध्ये येणाऱ्या विविध सणांना तसेच महान पुरुषांचे, संतांचे जयंती उत्साह, शोभायात्रा, मिरवणूक, करीता परिवर्तन ढोलताशा पथक चे वतीने नियोजन करण्यात येणार आहे. उद्घाटन सोहळ्यानिमित्त प्रात्यक्षिक करून कुतूहल दाखविले आहे.
शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर बुद्ध विहार सिंदेवाही यांच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 10 फेब्रुवारी 2024 शनिवारला उद्घाटन समारंभ आंबेडकर चौक येथे आयोजित करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी उद्घाटक निक्कु भैसारे,श्रीमती डांगे मॅडम, डॉ. विनोद नागदेवते, तेजस डोंगरे,भोजराज सोरदे ,नंदू खोब्रागडे ,गणेश मेश्राम, नगरसेवक दिलीप रामटेके, गिरी ढवळे, संजय रामटेके यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे संचालन कुंदन गजभिये, प्रास्ताविक नंदू खोब्रागडे, आभार प्रदर्शन संजय रामटेके यांनी केले.