माता रमाई आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

समता संघर्ष समाज परिवर्तन संघटनेचा उपक्रम
गडचिरोली :- समता संघर्ष समाज परिवर्तन संघटनेच्या वतीने प्रथमच विखुरलेल्या समाजाला एकत्र करून गडचिरोली येथे माता रमाई जयंती केली साजरी . सविस्तर वृत्त असे की,7 फेब्रुवारी 2024 रोजी बुधवारला 12 वाजता संविधान सभागृह, बळीराजा पॅलेस,गडचिरोली येथे माता रमाई भीमराव आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली,
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.काशिनाथ देवगडे साहेब प्रथम क्लास वन अधिकारी गडचिरोली, उपाध्यक्ष, मायाताई मोहूर्ले मॅडम महिला आघाडी अध्यक्ष, उद्घाटक मा.लक्ष्मणजी मोहूर्ले साहेब सामाजिक कार्यकर्ते , दीपप्रज्वलन मा.डॉ क-हाडे सर ,मा. धर्मानंद मेश्राम, सर मा. दौलत पोवरे सर, मा. प्रेम जरपोतवार युवा कार्यकर्ते, मा तानादु दुर्गमवार सर, मा.राज बंसोड साहेब,विशेष अतिथी मा.दौलतजी पोवरे साहेब मा.संमय्या पसूल्ला साहेब, सरिता पोवरे, क-हाडे मॅडम, सुषमा भडके मॅडम, कुंदा कांबळे मॅडम, या कार्यक्रमात युवा कार्यकर्ते प्रेम जरपोतवार यांनी माता रमाई यांच्या जीवनावर प्रकाश टाकून आपला समाज कसा घडला पाहिजे यावर मोलाचे मार्गदर्शन केलं , तसेच महिला सुद्धा या कार्यक्रमात मागे न राहता भडके ताई, क-हाडे ताईंनी, माता रमाई यांच्या जिवनावर महिलांनी सुंदर गीते सादर केली . संघटनेचे पदाधिकार्यांनी मा. दौलत पोवरे सर व सरिता पोवरे यांचा सामाजिक कार्यातील सहभागासाठी सपत्नीक सत्कार करण्यात आला. धर्मानंदू मेश्राम सर यांचा सत्कार संघटनेच्या वतीने करण्यात आला.
यावेळी बहुसंख्येने आपले समाज बांधव भगिनी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन मा. तानादू दुर्गमवार सर तर आभार प्रदर्शन मा.विजय देवतळे जिल्हा अध्यक्ष, गडचिरोली, स.स.स.प.सं.म.रा. मा.किशोर नरूले तसेच संघटनेतील कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नाने कार्यक्रम संपन्न झाला. कळत नकळत आमच्या समता संघर्ष समाज परिवर्तन संघटनेला सहकार्य केलं त्यांचे संघटनेच्या वतीने आभार..