राजुरा शहर येथे साईनगर मधे नवीन कोरोना रुग्ण आढळला.
file photo
आशिष यमनुरवार
विदर्भ न्यूज २४
राजूरा शहर प्रतिनिधी
राजुरा शहर येथे साईनगर मधे नवीन कोरोना रुग्ण आढळला.
चंद्रपुर जिल्हा हा गेल्या दोन महिन्यापासून एकही रुग्ण नसल्याने ग्रीन झोन मध्ये होता मात्र काही दिवसापूर्वी अचानक 50 रुग्णाची नोंद चंद्रपूर जिल्ह्यात झाली.त्यातले 25 रुग्ण बरे होऊन घरी परतले.आणि आता 25 रुग्ण राहिले असताना मात्र आज दुपारी अचानक पुन्हा एकदा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण राजुरा शहरातील साईनगर येथे मिळाल्याने प्रशासन खडबडून जागे झाले असुन आज हा व्यक्ती राजुरा येथे संस्थात्मक विलगीकरणात होता. कोरोना पॉझिटिव्ह असल्याची खात्रीलायक माहिती आहे.
सध्या मिळालेल्या माहितीनुसार हा व्यक्ती राजुरा येथिल रहिवासी असुन तो अहमदाबाद येथे वास्तव्यास होता. परत आल्यापासून तो आदिवासी वसतीगृहात संस्थात्मक विलगीकरणात होता. नियमित तपासणी दरम्यान त्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याला तात्काळ चंद्रपूर येथिल आयसोलेशन सेंटर मधे पाठविण्यात आले आहे.आता मात्र राजुरा शहरातील जनतेनी सतर्क राहून विनाकारण घरा बाहेर पडू नये अशी विनंती *विदर्भ न्यूज २४* च्या वतीने करण्यात येत आहे.



