हिरापूर येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी साजरी
आज दिनांक १०/१/२०२४ रोजी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ हिरापूरचे वतीने राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांची ५५ वी पुण्यतिथीचा तीन दिवसीय कार्यक्रम चे उद्घाटन करण्यात आले. या पुण्यतिथी निमित्त दरवर्षी तीन दिवस विविध स्पर्धा आयोजित करण्यात येतात. रोज ग्राम स्वच्छ करून नवनवीन प्रबोधनात्मक कार्यक्रम केले जाते. आणि शेवट समारोपीय कार्यक्रम केले जाते. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मान. विलासभाऊ अत्राम दुर्गापूर.उद्घाटक गावच्या प्रथम नागरिक सरपंच प्रीती ताई गोहने आणि प्रमुख पाहुणे माजी सरपंच बंडू मेश्राम, गुलाबराव महाराज, रुमजी कोरडे ग्रा. प.सदस्य, शरद कंनाके उपसरपंच, माधुरी अत्राम, निता मुंघटे तसेच पाटेवार सर, शिदाम सर, लाडे सर, रघुनाथ शेडमाके आणि समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.



