Vidarbh24News

Latest Online Breaking News

*दिनांक २८,२९,३० डिसेंबरला वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन

*विश्वशांती विद्यालयाचा उपक्रम*
सावली(प्रा.शेखर प्यारमवार)

भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली द्वारा संचालित विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय सावली येथे दिनांक २८, २९ आणि ३० डिसेंबर २०२३ या कालावधीत वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या शारीरिक व बौद्धिक विकास साधण्यासाठी दरवर्षी विद्यालयात स्नेहसंमेलन घेण्यात येतो. सदर स्नेहसंमेलनाचे उद्घाटन भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संदीपभाऊ गड्डमवार यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिव राजाबाळ पाटील संगीडवार यांचे उपस्थितीत मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित राहणार आहेत.

तीन दिवस चालणाऱ्या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांसाठी कबड्डी,खो-खो,रनिंग,गोळा फेक, बुद्धिबळ,व्हॉलीबॉल इत्यादी मैदानी खेळ तर वादविवाद स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा,गीतगायन स्पर्धा,प्रश्नमंजुषा,बचाव स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी बौद्धिक स्पर्धा घेण्यात येणार आहेत. तसेच सावली पोलीस स्टेशनचे ठाणेदार आशिषजी बोरकर व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मधुकरजी वासनिक यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभणार आहे.

आयोजित स्नेहसंमेलनात विद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थी आणि सोबत पालकांनी सुद्धा सहभाग घ्यावा असे आवाहन विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार यांनी केले आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!