राधिका दोरखंडे ठरली बेस्ट स्टूडेंट ऑफ ईयर
राजुरा: स्थानिक शिवाजी महाविद्यालय येथे सहा दिवसीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला. महोत्सवात या वर्षीचा बेस्ट स्टूडेंट ऑफ दी ईयर – 2023 हा पुरस्कार शिवाजी महाविद्यालयाची विद्यार्थिनी राधिका अविनाश दोरखंडे हिने पटकाविला. तिला महाविद्यालयाकडूून 10 हजार रूपये आणि स्मृति चिन्ह प्रदान करण्यात आले. द्वितीय तिन हजार रूपयांचा पुरस्कार साक्षी कांबळे व तृतीय पारितोषिक रोशनी बोरकुटे,जान्हवी बोढे यांनी पटकाविला.
या स्पर्धेचे परीक्षण डाॅ. शरद पोकळे, डाॅ.भालचंद्र आतकुलवार, डाॅ.मनोज राघमवार यांनी केले. यावेळी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अविनाश जाधव, प्राचार्य डॉ. एस.एम. वारकड, उपप्राचार्य डॉ. राजेश खेरानी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाला प्रा.डाॅ.चेतना भोंगाडे, डाॅ.अनिता रणधीर, डाॅ.संजय लाटेलवार, डाॅ.संतोष देठे, डाॅ. विश्वास शंभरकर, डाॅ..वी.जी. दुधे उपस्थित होते.



