*सामदा बुज. वनपरीक्षेत्रात वाघाचा मृतदेह आढळून आल्याने वनविभागात खळबळ*
*सावली*–चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील सावली वनपरीक्षेत्रातर्गंत येणाऱ्या व्याहाड खुर्द उपवन परिक्षेत्रातील सामदा बुज वन बीटा मधील रामदास देवतळे सामदा बुज यांच्याअतिक्रमित शेतात आज सकाळी वाघ मृतअवस्थेत आढळून आल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे.
सदर घटनेची माहिती वनविभागाला मिळताच सावली वनपरीक्षेत्राचे प्रभारी वनपरीक्षेत्र अधिकारी राजूरकर आणि व्याहाड खुर्द उपवन क्षेत्राचे अतिरिक्त क्षेत्र सहाय्यक आर. जी. कोडापे व त्यांच्या चमुने घटनास्थळ गाठून वाघाच्या मृतदेहास ताब्यात घेतले व शवविच्छेदनास रवाना केले.
नेमका वाघाचा मुत्यु कशाने झाला.हे शवविच्छेदनानंतर समोर येईल, पुढील तपास वनविभागाकडुन सुरु आहे….



