*महापरिनिर्वाण दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धा संपन्न

*अखिल भारतीय मादगी समाज संघटनेचा उपक्रम*
*अखिल भारतीय मादगी समाज संघटना (म.रा.)शाखा सावली व लहुजी ब्रिगेड * यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूर व गडचिरोली जिल्हास्तरीय स्पर्धा दिनांक ६ डिसेंबर २०२३ ला सकाळी १o वाजता *मौजा पाथरी येथे* परमपूज्य *डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी* बाबासाहेबांना वैचारिक अभिवादन करण्यासाठी *”कही हम भूल न जाये”* या अभियानातून पहिल्यांदाच *वक्तृत्व स्पर्धा* आयोजित करण्यात आली होती. वक्तृत्व स्पर्धेचा विषय होता. *” डॉ बाबासाहेब आंबेडकर नसते तर…..”*
या वक्तृत्व स्पर्धेत पुरुष गटात प्रथम क्रमांक प्रेम जरपोतवार यांनी पटकावला. द्वितीय क्रमांक गजानन आलेवार, तृतीय पारितोषिक भूषण कोरेवार यांनी पटकावला. महीला गटातून प्रथम क्रमांक प्राजक्ता कोरगंदावार, व्दितीय क्रमांक अस्मिता लाटेलवार, तृतीय क्रमांक खुशबू इटकलवार हिने पटकावला.
कार्यक्रमाची सुरवात महामानवाच्या प्रतिमेचस अभिवादन आणि संविधान प्रस्तावना वाचून करण्यात आली. अनेक स्पर्धकांनी आपआपली मते व्यक्त केली यामध्ये तिसऱ्या वर्गातील समिर गोरडवार याने सर्वांची मने जिंकून घेतली. त्याला प्रोत्साहन पर बक्षिस देण्यात आले.
अखिल भारतीय मादगी समाज संघटना राष्ट्रीय अध्यक्ष मोहन देवतळे यांच्या अध्यक्षतेत कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाला किशार नगराळे सर, लक्ष्मण मोहूर्ले मेजर, मायाताई मोहुर्ले, अखिल भारतीय मादगी समाज संघटनेचे अध्यक्ष रुपचंद लाटेलवर, महिला अध्यक्ष मायाताई सॅन्ड्रावार, निलिमा बोलीवार प्रदेश संघठिका, प्रदेश सचिव आकाश आलेवार, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष अनिल बोटकावार, गडचिरोली जिल्हाध्यक्ष विजय देवतळे, किशोर नरुले जिल्हा संघटक, शामराव झिलपलीवार चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष, रमेश लाटेलवार सावली तालुका अध्यक्ष, अजय मोहूर्ल कोरपणा तालुका अध्यक्ष , चंद्रहास इटकलवार, पोंभूर्णा तालुका अध्यक्ष, , विनोद बचलवार, गोविंदा कामरेवार, बालाजी नरुले , चंद्रपूर शहर अध्यक्ष रुपेश वालकोंडे, गडचिरोली शहर अध्यक्ष कालिदास लाटेलवार, विनोद आसमपल्लीवार, बबनराव गोरंतवार, राजू कलगट्टीवार, खगेन्द्र आलेवार, भोजराज मुत्यालवार, दुर्वास आलेवार आदी मंडळी उपस्थित होती.
पथारी गावातील सरपंच अनिता ठिकरे, उपसरपंच प्रफुल्ल तुम्मे,अल्का वाघधरे ग्रां स बौद्ध समाज अध्यक्ष सतीश उंदिरवाडे , कमलेश वानखेडे सामाजिक कार्यकर्ता गावकरी तसेच बाहेर गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योतीताई आसमपल्लीवार यांनी तर आभारप्रदर्शन रुपचंद लाटेलवार यांनी केले.