किसान विद्यालयात.ओमदेव रडके यांचा सेवानिवृत्ती पर निरोप समारंभ.
जेप्रा/ दिनांक- 1/12/2023
किसान विद्यालय जेप्रा येथील शारीरिक शिक्षक श्री ओमदेव तामदेव रडके यांच्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्तीपर निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न झाला. या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी , श्री.एन.बी. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ जेप्रा चे अध्यक्ष मा. पी. एन .पाटील म्हशाखेत्री हे होते.तसेच प्रमुख अतिथी म्हणून परशुराम पा.म्हशाखेत्री विश्वनाथ निकुरे ,
मा. ओमदेव रडके, पुष्पा रडके,चौधरी सर गोंडवाना सैनिक विद्यालय वामनराव चौधरी ,वामनराव धुडसे,
मुकुंद पा.म्हशाखेत्री प्राचार्य विलास मेश्राम आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.कार्यक्रम प्रसंगी प्रास्ताविकातून श्री विलास मेश्राम व प्रमुख अतिथींच्या भाषणातून श्री ओमदेव रडके यांच्या बालपणापासून आजपर्यंतच्या सर्व आठवणींना उजाळा देण्यात आला.
ग्रामीण भागातील एक साधारण विद्यार्थी, क्रीडा क्षेत्रात नावलौकिक प्राप्त करून विद्यालयात क्रीडा प्रशिक्षक म्हणून ,अनेक विद्यार्थी घडविणारा एक अव्वल मार्गदर्शक म्हणून श्री ओमदेव रडके सर यांनी आपला सेवाकाळ गाजविला, असे गौरव पूर्ण वर्णन प्राचार्य
श्री मुकुंद पा.म्हशाखेत्री यांनी आपल्या भाषणात विशद केले. त्यांच्या कार्यकाळात विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी तालुका , जिल्हा, विभाग ते राज्यस्तरावर विविध क्रीडा स्पर्धात सहभाग घेऊन यश संपादन केल्याचे त्यांनी विशद केले.सेवापूर्ती व सेवानिवृत्ती निमित्त ओमदेव रडके व त्यांची पत्नी पुष्पा रडके
यांचा विविध भेटवस्तू ,पुष्पगुच्छ ,शाल ,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.श्री ओमदेव रडके यांनी आपला जीवनाचा प्रवास व त्यांची क्रीडा क्षेत्राशी जोडलेली नाड याबाबतची माहिती आपल्या मनोगतात व्यक्त केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. पी. एन .पाटील म्हशाखेत्री साहेब यांनी त्यांना सेवानिवृत्तीनंतरच्या काळातील जीवनाच्या व निरोगी आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या व गरज पडल्यास त्यांनी वेळोवेळी शाळेतील विद्यार्थ्यांना खेळाशी संबंधित मार्गदर्शन करावे असे आवाहन केले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सचिन म्हशाखेत्री तर आभार उज्वला तायडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अरविंद उरकुडे , विनोद गोबाडे ,गुरुदेव चापले ,प्रा. विनोद म्हशाखेत्री,कु. मीना म्हशाखेत्री,
श्री खुशाल दुमाने ,नेताजी गावतुरे ,मनोहर निकुरे,
पुष्पा मेश्राम व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.



