*२३ गोवंश असलेला कंटेनर पकडला
*सावली पोलिसांची कारवाई*
सावली (रुपचंद लाटेलवार)
आज गडचिरोली कडून मुल कडे एका ट्रक मधून रात्री १२ वाजता दरम्यान अवैध गोवंश वाहतूक होणार अशी गोपनीय माहिती मिळाली असता सापळा रचून संशयित ट्रक एम एच ४० सि एम २६१४ थांबवून झडती घेतली असता त्यामध्ये २३ गोवंश जनावरे क्रूरपणे तोंडाला मोरके व दोर बांधलेले दिसून आले.
सदरची जनावरे गोशालेत दाखल करण्यात आले.
मिळून आलेले ३५ जनावरे व बाराचाकी टाटा ट्रक किंमत असे मिळून एकूण १५,५०,००० रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपींवर शेख जाकीर शेख मेहबूब, इर्शाद उल्लाह खान किस्मत उल्ला खान दोन्ही राहणार मुर्तीजापुर जिल्हा अकोला,मोहसीन अली मोबीन अली राहणार आकोट जिल्हा अकोला यांचेवर संबंधित विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक रवींद्र सिंग परदेशी, अप्पर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू यांचे मार्गद्शनाखाली ठाणेदार आशिष बोरकर यांचे नेतृत्वात सावली पो स्टे चे हेड कॉन्स्टेबल विशाल दुर्योधन, रामदास कोंडबत्तूवार, संजय शुक्ला, पो शि चंदू गंपलवार, विजय कोटणाके यांनी केली.



