चिचबोडी ग्रामपंचायत विविध विकास योजना राबविल्याने गट विकास अधिकारीनी दिली भेट
सरपंच सतीश नंदगीरवार याचा पुढाकार
सवली:- ज्या गावात जन्म झाला त्या गावासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून समाजसेवेचे भान ठेवून शासकीय स्तरावर गावाची ओळख झाली पाहिजे या हेतूने गावात विविध प्रकारचे उपक्रम राबविल्याने गटविकास अधिकारी यांनी आपल्या पथकासोबत नुकतीच चीचबोडी ग्रामपंचायत ला भेट दिली.त्यामुळे येथील सरपंच सतीश नंदगीरवार यांनी स्वागत करीत २० हेक्टरवर २० हजार झाडे लावण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे सांगितले आहेत.
तालुक्यातील चीचबोडी या गावाकडे विकासाचे दृष्टीने दुर्लक्ष झाले होते. मात्र तरुण सरपंच सतीश नंदगीरवार हे सरपंच झाल्याने शासकीय स्तरावर अनेक समस्या मांडुन गावात विविध प्रकारचे विकास कामे ओडून आणले आहेत. नेहमीच विविध प्रकारचे घरकुल, रस्ते,क्रीडांगण, गोडाऊन, तलाव खोलीकरण अशा प्रकारच्या गावात विकास योजना राबविल्या जातात. शासकीय स्तरावर कामाची मागणी केली जाते.
सामूहिक वनहक्क क्षेत्राच्या विकासासाठी वीस हेक्टरवर वीस हजार वृक्ष लागवड व रोपवाटिका तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे गटविकास अधिकारी मधुकर वासनिक यांनी पथकासह ग्रामपंचायत भेट दिली. शासकीय योजनांची माहिती देऊन सुरू असलेल्या कामाच्या कार्याचा गौरव केला.
यावेळी सुभाष डहारे ग्रामसेवक, मनरेगाचे अधिकारी प्रशांत भोयर, नितीन दुवाव्वार, रोशन येरोजवार, वनव्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, जि.प.मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका, आशावर्कर, टाटा सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी प्रवेश सुटे, नितीन ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते.



