Vidarbh24News

Latest Online Breaking News

सिंचनासाठी पाण्याचा योग्य वापर करून उत्पादन घ्या

*_उसेगाव ता.जि.गडचिरोली येथील बंधाऱ्याच्या पाहणीदरम्यान खासदार अशोक नेते यांचे आवाहन_*

दि.१९ नोव्हेंबर २०२३

गडचिरोली: नदीनाल्यांचा व पाण्याचा जिल्हा म्हणून गडचिरोलीची ओळख आहे. तरीही उन्हाळ्यात जिल्ह्यात पाणी समस्या निर्माण होते. मात्र, उसेगाव येथील नागरिकांनी पुढाकार घेऊन कठानी नदीवर श्रमदानातून बंधारा बांधला, त्या बंधाऱ्यांतील पाण्याचा शेतीसाठी योग्य वापर करून उत्पादनात वाढ करावी, असे आवाहन खासदार अशोक नेते यांनी केले.
तालुक्यांतर्गत येणाऱ्या उसेगाव येथील नागरिकांनी कठानी नदीवर श्रमदानातून बंधारा बांधला. यामुळे उसेगाव परिसरात कठानी नदी दुथडी भरून आहे. या बंधाऱ्यांची पाहणी करण्यासाठी खासदार अशोक नेते, भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, समय्या पसुला रविवार, १९ नोव्हेंबरला सायंकाळी उसेगाव येथे भेट दिली. यावेळी ते उपस्थित शेतकऱ्यांशी बोलत होते.
जिल्ह्यातील नदीनाल्यांवर यासारखे बंधारे बांधल्यास उन्हाळ्यातही जिल्हात पाणी समस्या निर्माण होणार नाही, यासाठी प्रत्येक गावातील नागरिकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. केवळ उपक्रम म्हणून बंधारे बांधून फायदा नाही तर त्या बंधाऱ्यांतील पाण्याचा वापर करून विविध उत्पादन पिके शेतकऱ्यांनी घ्यावे. असे याप्रसंगी खासदार अशोक नेते यांनी आवाहन केले.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!