*राज्य अधिवेशनासाठी व्हॉईस ऑफ मिडिया सावलीची चमू बारामतीला रवाना*
*मुख्यमंत्र्यांसह सर्वपक्षिय नेते उपस्थित राहणार*
:लढा पत्रकारीता आणि पञकारांसाठीचा हे ध्येय समोर ठेवुन राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या व्हॉईस ऑफ मीडियाच्या बारामती येथील राज्यव्यापी शिखर आधिवेशनासाठी सावली तालुक्यांतील बहुतांष पत्रकार सहभागी होणार आहेत
पत्रकारांचे हित आणि अडीअडचणीवर विचार मंथन होवुन करावयाच्या कार्याची रुपरेषा ठरविण्यासाठी व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने पुणे जिल्ह्यातील बारामती येथे दि. 18 आणि 19 नोव्हेंबर 2023 रोजी राज्यव्यापी शिखर आधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. विद्या प्रतिष्ठानच्या भव्य परीसरातील गदीमा सांस्कृतिक सभागृहात आयोजित पत्रकारांच्या दोन दिवसीय आधिवेशनाचे उदघाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते होणार आहे. विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचे अध्यक्षतेखाली आयोजित आधिवेशन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, अजीत पवार, शरदचंद्र पवार, सुप्रीया सुळे यांचेसह वृत्तपत्र सृष्टीतील अनेक दिग्गज मान्यवर संपादक व पत्रकार मंडळी प्रामुख्याने उपस्थित राहुन पत्रकारांना मार्गदर्शन करणार आहेत. पञकारांचे हित डोळ्यासमोर ठेवुन आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारांच्या अभुतपुर्व आधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी सावली तालुक्यांतील व्हाईस ऑफ मीडियाची चंमु आज सकाळी 9.00 वाजता सावली वरून रवाना झाली.



