सावलीला १०० रुपयाचा स्टॅम्प मिळतो १३० ला
स्टॅम्प पेपरसाठी जावे लागते व्हेंडरच्या घरी
आजकाल कोणतेही शासकिय काम करायचे असेल तर स्टॅम्प पेपरची गरज पडते. विद्यार्थांना जात पडताळणी साठी, घरकुल योजनेसाठी, कोणत्याही प्रकारचे शपथपत्रासाठी, शेतकऱ्यांना कर्ज घेण्यासाठी, १०० रुपयाच्या स्टॅम्प गरज आहे मात्र सावलीचे स्टॅम्प विक्रेते तुळशीराम गेडाम परवाना क्रमांक १३४० मागिल एक वर्षापासून दूर्धर आजाराने त्रस्त आहेत. कधीही सावली तहसिल कार्यालयात स्टॅम्प पेपर खरेदी करण्यासाठी साठी गेल्यास उपस्थित राहत नाही.
स्टॅम्प पेपर खरेदीसाठी नागरिकांना स्टॅम्प व्हेंडरच्या घरी जावे लागते. तेही १०० रूपयाचा स्टॅम्प १३० रुपयाला विकत घ्यावे लागते.
सुरवातीला सावली तालुक्यांत दोन स्टॅम्प व्हेंडर होते त्या पैकी यादव मोहूर्ले मरण पावले सध्या एकच स्टॅम्प व्हेंडर आहेत तेही चढ्या भावाने स्टँप पेपर ची विक्री करित आहेत त्यामुळे नागरिकांना किंमत तर जास्त मोजावी लागत आहे त्याचबरोबर स्टॅम्प व्हेंडर तहसिल कार्यालयात उपस्थित राहत नसल्यामुळे नागरिकांना भटकंती करावी लागते.
*सावली तालुक्यांतील स्टॅम्पपेपरची उणीव पाहता स्टॅम्प व्हेंडर नियुक्ती करून नागरिकांची भटकंती थांबवावी.
*नितिन गोहणे*
*तालुका काँग्रेस अध्यक्ष*



