Vidarbh24News

Latest Online Breaking News

सावली तालुक्यातील,मौजा. बोथली येथील महिलेस शस्त्रक्रियेसाठी मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याकडून आर्थिक मदत

*माझ्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बरी नसून डॉक्टरांनी माझी गर्भ पिशवी निकामी झाल्याचे सांगितले,पूढील उपचाराकरिता मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याकडे मदत मागितली असता त्यांनी तात्काळ मदत दिल्याबद्दल त्याचे मनापासून आभार करते–पुष्पाबाई शिंदे,रुग्ण, बोथली*

*दिनांक : १६ नोव्हेंबर २०२३*

*सावली(ता.प्र.):-जनसेवा हिच ईश्वर सेवा याचे व्रत जोपसणारे लोकनेते विरोधी पक्षनेते,माजी मंत्री तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा.श्री. विजयभाऊ वडे्ट्टीवार यांच्यातर्फे मौजा.बोथली येथील पुष्पाबाई रामाजी शिंदे,यांना गर्भ पिशवी शश्त्रक्रियेसाठी, सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहणे व सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष मा.प्रदीप पाटील गड्डमवार व उपसरपंच मा.विजय पाटील गड्डमवार यांच्या हस्ते आर्थिक मदत देण्यात आली.*

*पुष्पाबाई शिंदे वय ५० वर्षे राहणार मौजा.बोथली ह्या घरातील कमवत्या महिला असून आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळे मिळेल ते काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होत्या,मागील काही दिवसापासून त्यांना पोटाचा त्रास जाणवत होता,त्या आजारी असल्यामुळे उपचार घेत होत्या.उपचारा दरम्यान डॉक्टरांनी त्यांची गर्भपिशवी निकामी झाल्याचे असल्याचे स्पष्ट केले,घरातील कमवत्या महिलेवर आजार ओढवल्याने शिंदे कुटुंबियांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत होता,आर्थिक स्थिती बिकट असल्याने पुढील उपचारासाठी आर्थिक मदत हवी असल्याची माहिती सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने यांना मिळाली.त्यांनी तात्काळ राज्याचे विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांना संपर्क करून पुष्पाबाई शिंदे यांना आर्थिक मदत मिळवून दिली.*

*आर्थिक मदत देताना सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहणे,बोथलीचे उपसरपंच व जेष्ठ काँग्रेस कार्यकर्ता मा.विजय पाटील गड्डमवार,सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष मा.प्रदीप पाटील गड्डमवार, पत्रकार प्रा.शेखर प्यारमवार,बोथली येथील काँग्रेस कार्यकर्ते मा.राजू मुप्पावार,मा.विशाल मुस्कावार,मा.रवी कन्नाके तसेच आदी कार्यकर्ते उपस्थित होते.*

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!