प्रत्येकाला मिळणारं 5 लाख रुपयांपर्यंत मोफत इलाज
*आयुष्यमान भारत योजना आता सर्वांसाठी लागू*
*सरकारी सोबतच खाजगी रुग्णालयात सुद्धा मिळणार मोफत इलाज*
पुर्वी ही योजना 2011 च्या जनगणनेनुसार जे कुटुंब दारिद्र्य रेषेखालील येतात किँवा कमी उतपन्न गटात मोडतात अशाच व्यक्तींना लागू होती परंतु केंद्र सरकारने या योजनेचा विस्तार करून महाराष्ट्रतील प्रत्येक नागरिकाला आयुष्यमान भारत योजनेचा कार्ड काढता येईल. मग तो सरकारी कर्मचारी असो, व्यापारी असो, कि उद्योगपती असो की मजूर असो असा सर्वाँना समान तत्वावर ही योजना आधारित आहे.
ही योजना फक्त सरकारी रुग्णालयात नाहीं, तर खाजगी रुग्णालयात सुद्धा लागु आहे. महाराष्ट्रतील 1248 दवाखाने या योजनेशी संबंधित आहेत. गंभीर स्वरूपाचे, मोठी शस्त्रक्रिया, जवळपास 1200 बिमाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी नजिकच्या आपले सरकार सेवा केंद्र येथे संपर्क साधावा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिल 2018 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त झारखंडमधील रांची जिल्ह्यातून ही योजना सुरू केली होती.
आयुष्मान भारत योजना किंवा प्रधान मंत्री जन आरोग्य योजना, ही भारत सरकारची आरोग्य योजना आहे, जी 23 सप्टेंबर 2018 रोजी संपूर्ण भारतात लागू करण्यात आली. या योजनेची घोषणा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 2018 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती. या योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना (बीपीएल धारक) आरोग्य विमा प्रदान करणे होता. आता या योजनेअंतर्गत राज्यातील प्रत्येक कुटुंबाला 5 लाख रुपयांपर्यंतचा कॅशलेस आरोग्य विमा प्रदान केला जाईल.
येताना सोबत राशनकार्ड, आधार कार्ड आणि मोबाईल आणावे*
योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना लाभ
• प्रत्येक पात्र कुटुंबासाठी प्रति वर्ष ₹ 5 लाखांपर्यंत मोफत उपचारांचा लाभ
• योजनेशी संलग्न असलेल्या देशभरातील कोणत्याही ओळखल्या गेलेल्या सरकारी किंवा खाजगी रुग्णालयात मोफत उपचार सुविधा.
• प्रवेशापूर्वी 7 दिवसांपर्यंत तपासणी, उपचार आणि प्रवेशादरम्यान जेवण आणि तपासणी आणि डिस्चार्ज झाल्यानंतर 10 दिवसांपर्यंत औषधे मोफत उपलब्ध आहेत..
*कोट*
“आयुष्यमान भारत योजने अंतर्गत दोन वर्षापूर्वी माझा डोळ्याचा ऑपरेशन झाला आणि मला आता स्पष्ट दिसते “
*लाभार्थी मंगरू भोयर जिबगाव*
“जास्तीत जास्त लोकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. आरोग्याच्या समस्येपासून दुर राहावे.”
डॉ. धनश्री मर्लावार(अवघड)
तालुका वैद्यकिय अधिकारी, सावली