बेस्ट कोरीओग्राफर अवॉर्डने सन्मानित
चंद्रपूर: जेसीआय क्लब चंद्रपूर यांच्या संयोजनाने प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात दिनांक 3 सप्टेंबर रविवारला कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते. यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून कोरिओग्राफर आपआपली टीम घेऊन आलेले होते. त्यात चंद्रपूर मधील काही शाळांनी सुद्धा सहभाग होता. त्यामध्ये आपापली टीम घेऊन शाळेतील टीचर स्वतः कोरिओग्राफी करून मुलांना तयार केलेले होते. यामध्ये खालसा कॉन्व्हेंट हायस्कूल चंद्रपूर या शाळेच्या श्रावणी पेदापल्लीवार आणि हिना खान यांनी बेस्ट कोरिओग्राफर म्हणून अवार्ड पटकविला. यात वैदेही हेडाऊ, सोफिया गांधारला, कृतिका ठाकूर, पैया पेंदोर, आराध्या गड्डमवार, प्रत्युषा धामणगे ,गारगी मोहुर्ले, अहाना अली, अलिषा खान पठाण, अवनी खनके, प्रणाली बंडेवार, नव्या चाहारे, परिधी शेंडे, शिरीन शेख, मृदुला चौधरी, अवनी केदारपवार या सहा ते आठ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता आणि ग्रुप डान्स मध्ये सहभागी होऊन त्यांनी उत्तम डान्स करून शाळेचे नाव रोशन केले. यात प्रशांत घोडमारे आणि उमेश बनकर यांनी सहकार्य केलं. शाळेच्या मुख्याध्यापिका सिमरन साहनी यांचे खूप सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले. शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांना ट्रॉफी आणि सर्टिफिकेट देऊन प्रोत्साहित केले. या यशाचे श्रेय शाळेच्या मुख्याध्यापिका सिमरन सहानी, श्रावणी पेदापल्लीवार, हिना खान यांना जाते.



