*महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटना वरोरा च्या वतीने ‘OPS राखी’* *उपक्रमाचा श्रीगणेशा….*
आज दिनांक 28 ऑगस्ट 2023 रोजी *महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटना तालुका शाखा वरोरा* च्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात 28 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2023 पर्यंत चालणाऱ्या *OPS राखी* या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला..त्यासाठी *पंचायत समिती सभागृह वरोरा* इथे तालुका संघटनेच्या महिला प्रतिनिधी एकत्रित आल्या व त्यांनी *OPS राख्यांची* निर्मिती केली व त्या सर्व राख्या मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आल्या.. राखीसोबत जुनी पेन्शन लागू करावी यासाठी एक भावनिक साद घालणारे पत्र सुद्धा प्रत्येक महिला भगिनींनी मुख्यमंत्री महोदयांना पाठविले..ज्या भगिनी आजच्या उपक्रमात सहभागी होऊ शकल्या नाही त्या सर्वांनी आपापल्या परीने ops राखी पाठविण्याचे तसेच आपण ज्या कार्यालयात कार्यरत असाल तेथील सर्व महिला भगिनी एकत्रित येऊन OPS राखी पाठवून त्याची प्रसिध्दी करण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले..याप्रसंगी प्रियंका तितरे, प्रतिभा वाकडे, अर्चना घुटके, निरांजली कुंभारे, वनिता धुडसे, स्वाती खराबे, श्वेता लांडे, दिप्ती चौखे, सुचीता कुळे, पूजा कुंटेवार, स्नेहल खिरटकर, सपना बोम्मावर, मनीषा नन्नावरे, जया पुनवटकर, माया ढेंगळे , आशा गोवारदिपे, अर्चना पिंपळशेंडे, वनकर मॅडम व नंदा चौधरी या पेंशन फायटर उपस्थित होत्या…
*एकच मिशन – जुनी पेंशन*



