Vidarbh24News

Latest Online Breaking News

नागपंचमी निमित्त सापाबद्दल किसान विद्यालयात मार्गदर्शन

नागपंचमीच्या निमित्याने सापाबद्दल माहिती व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . सदर कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक चापले सर यांनी सापाबद्दल सविस्तर माहिती आणि मार्गदर्शन केले. चापले सरांनी सापाबद्दल माहिती देतांना “सध्याच्या स्थितीत सापांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होत असून हे पर्यावरण व शेतकऱ्यासाठी चिंतेची बाब आहे सापांचे संरक्षण करणे म्हणजेच पर्यावरण व शेतकऱ्यांची मदत करणे ही काळाची गरज आहे”असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थांना सांगितले. तसेच त्यांनी सापाची उत्पती सापाचे विषयावरून होणारे वर्गीकरण विषारी, निमविषारी, बिनविषारी सापांच्या प्रजातीच्या आपल्या शेतीतील व गडचिरोली जिल्ह्यातील आढळणाऱ्या प्रमुख सापांची ओळख नसल्याने बिनविषारी सापच मोठ्या प्रमाणात मारले जातात असेही त्यांनी सांगितले.

सापाबद्दल समाजात असलेल्या अंधश्रद्धा कितपत खोट्या आहेत याबद्दल माहिती दिली.त्यासोबत मंत्राने विष उतरत नाही तर त्याकरीता त्याच सापापासून बनविलेल्या विषप्रतिरोधक इंजेक्शन घेणे हेच त्या सापांच्या विषापासून वाचन्याचे एकमेव उपाय आहे त्यामुळे कोणत्याही बुवा बाबांच्या, मांत्रिकाच्या किव्हा नागमोत्यांच्या आधीन जावून आपले जीव धोक्यात घालवू नका असेही त्यांनी उपस्थितीत विद्यार्थांना सांगितले.देशात अन्नधान्याच्या उत्पादना पैकी 33% धान्य हे उंदीर नष्ट करतात उंदिरावर नियंत्रण ठेवण्यासाठी साप हे शेतकऱ्यांचे मदत करतात .साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे .यामुळे सापांचे रक्षण करण्या करिता व पर्यावरणाला मदत करण्याकरिता साप दिसल्यास तात्काळ सर्पमित्राना कळवा व सापांचे जीव वाचवा असे आव्हाहन केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष किसान विद्यालय जेप्रा शाळेच्या विद्यार्थी मंत्रीमंडळाचे मुख्यमंत्री कुमारी अनुष्का वाढणकर, प्रमुख पाहुणे ऊज्वला तायडे ह्यांनी नागप्रतीमेचे पुजन केले ,कार्यक्रमाला शिक्षीका मीनाताई म्हशाखेत्री तसेच विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग ५ते १०चे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन चंद्रसेन खोब्रागडे यांनी केले. व सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची प्रसाद देऊन सांगता केली.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!