किसान विद्यालयात सद्भावना दिनाची प्रतीज्ञा
युवा कल्यान तथा क्रीडा मंत्रालय भारत सरकारच्या पत्रकानुसार किसान विद्यालय जेप्रा येथे, सद्भावना दिन आणि मालार्पण कार्यक्रम घेण्यात आला. २०ऑगष्ट २०२३ हा दिन भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधीं यांचा जयंती दिन आहे,याचे औचित्य साधून पत्रकानुसार दिनांक १८/ऑगष्ट २०२३ ला विद्यालयात स्वर्गीय राजीव गांधीं यांच्या प्रतीमेला वरीष्ठ शिक्षक विलास मेश्राम यांनी माला अर्पण केले,

सर्व शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मंत्रीमंडळातील सदस्यांनी पूष्प अर्पण करून सद्भावना व्यक्त केली. विद्यार्थ्यांना सद्भावना प्रतीज्ञा दिली गेली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन चंद्रसेन खोब्रागडे यांनी केले.



