भूसंपादन भुमीधारक बहुउद्देशीय शेतकरी संस्थेची कार्यकारिणी गठित
कोनसरी- लॉयडस मेटल्स एंड एनर्जी लिमिटेड कोनसरी करिता भूसंपादन केलेल्या सर्व भुमिधारक शेतकऱ्यांची जाहीर सभा कोनसरी येथील पतीत पावन मंदिरात घेण्यात आली. सभेत जुनी कार्यकारिणी बरखास्त करुन नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली. या समितीत अध्यक्षपदी विठ्ठल हनमंतू पोतराजवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. उपाध्यक्ष दादाजी देवाजी भोगेकार, कोषाध्यक्ष महादेव बाजीराव करपते, कार्याध्यक्ष नारायण बुधाजी इप्पावार, सचिव सुरेंद्र बापुजी चनेकार, सहसचिव तुकाराम रामचंद्र कन्नाके, सल्लागारपदी पांडुरंग पत्रुजी गेडाम, सुधाकर गणपती सोनटक्के,.साईनाथ भिवाजी तोरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सदर तयार झालेल्या समितीला भूसापंदन भुमिधारक बहुउद्देशीय शेतकरी संस्था कोनसरी असे नाव सर्वानुमते देण्याचे ठरविण्यात आले.
उपस्थित सर्व भुमिधारक शेतकऱ्यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.



