किसान विद्यालय गुणवंतांचा सत्कार आणि अभिष्टचिंतन सोहळा
किसान विद्यालय गुणवंतांचा सत्कार आणि अभिष्टचिंतन सोहळा
गडचिरोली- किसान विद्यालय जेप्रा येथे राष्ट्रीय हरित सेनेतर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमाला संस्थाध्यक्ष पी. एन. म्हशाखेत्री, यांनी अध्यक्षीय स्थान भूषविले परशुराम म्हशाखेत्री, विश्वनाथ निकुरे, प्राचार्य मुकुंद म्हशाखेत्री सरपंच शशिकला झंजाळ, उपसरपंच कुंदा लोणबले, वामनराव चौधरी, नेताजी गावतुरे, आनंदराव गुजलवार, उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते विविध रोपाचे रोपण करण्यात आले. याप्रसंगी हरित सेनेचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी ‘झाडे लावा झाडे जगवा’ हा संदेश उपस्थित महोदयांनी दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रसेन खोब्रागडआणि रााष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख विनोद गोबाडे यांनी वृक्षारोपण कार्यवाहीपार पाडली,
गुरुदेव चापले यांनी मान्यवरांचे आभार मानले. कार्यक्रम प्रसंगी शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी हजर होते,तसेच मनोहर निकुरे व सुरेश टेकाम यांनीही सहकार्य केले. या कार्यक्रमातून वृक्षसंवर्धनाचा संदेश देण्यात आला.तसेच अभिष्टचिंतन मूर्ती परशूराम पा. म्हशाखेत्री,यांचा अमृत महोत्सवी श्रीफळ देऊन मुकुंद म्हशाखेत्री यांनी सत्कार केला.

तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना 10 व्या वर्गातील स्वप्नील प्रभाकर नरुले,मनोज अनिल सहारे,अंकिता श्रीनिवास मल्लेलवार, प्रज्ञा गणेश गुरुनुले, रोहित नेताजी जेंगठे,वृषभ रवींद्र दखणे, राहुल आनंदराव मोगरकर,आणि 12 व्या वर्गातील सौदर्या टेमसू जेंगठे,निकिता सुरेश भांडेकर,अंजली भोलेनाथ मोहूर्ले यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचेअध्यक्ष मान्यवर पांडूरंग पा. म्हशाखेत्री यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता रडके सर,तायडे मॅडम, मीना म्हशाखेत्री मॅडम,सचिन म्हशाखेत्री सर, तिलेश मोहूर्ले यांनी सहकार्य केले .



