शिवणी शाळेतील दोन विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालयासाठी निवड
सिंदेवाही: जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शिवणी येथील विद्यार्थी संचित दयाराम अलोने व किशोर रतनशहा मडावी या विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालयासाठी निवड झाली असून त्यांचे कौतुक करण्यात येते आहे, त्यांनी यशाचे श्रेय आईवडील व मार्गदर्शक जे.के. मेश्राम, मार्गदर्शक व वर्गशिक्षक ज्ञानेश्वर नन्नावरे, मार्गदर्शक शिक्षिका भावना गुंडमवार यांना दिले आहे. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कवडू उरकुडे, गटशिक्षणाधिकारी किशोर पिसे, विस्तार अधिकारी (शिक्षण) बावणकर सर , केंद्रप्रमुख सज्जन तेल्कापल्लीवार, शाळेचे मुख्याध्यापक ईश्वर अगडे, शाळेचे शिक्षक रामचंद्र लोधे, विकास राजूरकर, सुरेश खोब्रागडे, संतोष मेश्राम, प्रवेंजकुमार मेश्राम, अजय सायंकार शालिनी खोब्रागडे यांनी अभिनंदन केले आहे.



