कवठी परिसरातील टॉवर कडे टॉवर कंपनीचे दुर्लक्ष…….
कवठी परिसरातील टॉवर कडे टॉवर कंपनीचे दुर्लक्ष…….
टॉवर कंपनीने यामध्ये लवकरात लवकर सुधारणा करावी, अशी परिसरातील नागरिकांची मागणी….
कवठी :दि.१६जून : तालुक्याचे ठिकाण असलेल्या सावली येथून आवघ्या ७ कि. मी. अंतरावर असलेल्या कवठी परिसरातील मोबाईल नेटवर्क साठी कवठी या गावामध्ये लोमेश पा. घोटेकार कवठी, यांच्या शेतात “इंडस टॉवर लिमिटेड कंपनीने” सन २००९ साली मोठया टॉवरची उभारणी केली होती. आणि त्याचे कामकाज सुरळीतपणे चालू होते. पण नैसर्गिक आपत्तीमुळे आलेल्या वादळामध्ये तो टॉवर कोसळून खाली पडला. आणि त्यामुळे परिसरात नेटवर्क प्रॉब्लेम सुरु झाला होता. परंतु सदर बाब लक्षात घेऊन कंपनीने त्याच्या बाजूलाच आपत्कालीन लहान प्रकारच्या टॉवरची उभारणी करण्यात आली. आणि ते सुरळीत चालू होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून या टॉवर ला नेटवर्क नाही आहे. त्यामुळे या परिसरातील मोबाईल ला नेटवर्क नसल्याने आपतकालीन येणारे व जाणारे फोनकॉल टळत आहेत. आणि सर्व ऑनलाईन व काही प्रमाणात ऑफलाईन कामे ठप्प पडलेली आहेत. यामुळे या परिसरातील नागरिकांना त्याचे मोठे त्रास सहन करावे लागत आहे, त्यामुळे इंडस टॉवर ली. कंपनीने लवकरात लवकर यामध्ये असलेले तांत्रिक बिघाड व अडचणीत सुधारणा करावी. अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.




