रिमझिम पावसामुळे जेप्रा परिसरतील पेरण्या खोळंबल्या
मृग नक्षत्र पूर्णपणे कोरडा गेल्या मूळे पावसाअभावी शेतकऱ्यांना पेरणी करता आली नाही आद्र नक्षत्र सुरू होताच सतत तीन दिवसपावसाची रिमझिम सुरू झाली शेतकऱ्यांना थोडीही सवड घेता येत नसल्याने जेप्रा राजगाटा माल राजगटा चेक दिभणा खरपुंडी परीसरात पेरण्या खोळंम्बल्या आहेत.हवामान खात्याच्या अंदाजा नुसार यावर्षी शेतकरी फार मोठया आशेने खरीप हंगामाची सुरवात केली मृग नक्षत्रात पाऊस पडल्यावर पेरणीला सुरवात करता येईल असा बेत शेतकरी बंधू लावून बसला होता पण पावसा अभावी ते शक्य झाले नाही आद्र नक्षत्रात काही भागात जोराचा पाऊस तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू झाला त्यामुळे शेतकऱ्यांचा उपाय हरला परिसरात रिमझिम पाऊस सुरू असल्याने शेतकरी मोठया विचारात पडला आहे?



