निर्लेखन चे सरकारी आदेश नसतांना सरकारी संपत्ती जमीनदोस्त,
निर्लेखन चे सरकारी आदेश नसतांना सरकारी संपत्ती जमीनदोस्त,
ग्रामपंचायत कमिटी व ग्रामविकास अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा– मिनार खोब्रागडे,
निर्लेखन चे सरकारी आदेश नसतांना सरकारी संपत्ती जमीनदोस्त,
ग्रामपंचायत कमिटी व ग्रामविकास अधिकारी येवली यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा– मिनार खोब्रागडे,
विदर्भ 24 न्यूज़
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोलि/
येवली: – गडचिरोली पासूण १ २ किमी. अंतरावर असलेल्या येवली ग्रामपंचायत येथे मिनार खोब्रागडे,यांनी दिनांक २४/०२/२०२० ला ग्रामपंचायत येवली कडून माहितीचा अधिकार कायदा २००५ अन्वये शौचालय इमारत जमीनदोस्त प्रकरणी माहिती मागविण्यात आली . त्यानुसार ग्रामपंचायत येवली द्वारे देण्यात आलेल्या माहिती मध्ये असे स्पष्ट होते कि, सन २००५ ला रोजगार हमी योजने तर्फे ग्रामपंचायत येवली द्वारे सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम करण्यात आले होते पण उत्तम स्थितीत असलेल्या शौचालयाची इमारत कोणत्याही प्रकारचा शासनाचा निर्लेखन आदेश न घेता फक्त ग्रामपंचायत मासिक सभेच्या ठरावाद्वारे दिनांक ०२ ऑक्टोबर २०१ ९ ला पाडण्यात आले असुन सदर प्रकरणाची तात्काळ चौकशी करून उत्तम स्थितीत असलेल्या शौचालयाची इमारत जमीनदोस्त करणे प्रकरणी ग्रामपंचायत कमिटी तसेच ग्रामविकास अधिकारी, येवली यांच्यावर शासकीय संपत्ती चे नुकसान केल्या प्रकरनी फौजदारी ( FIR ) गुन्हा दाखल करुण कार्यवाही करावी अशी मागणी मा. जील्हाधीकारी सा.गडचिरोली, तसेच मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली,मा.गट विकास अधिकारी,पंचायत समिती गडचिरोली यांचे कड़े भारतीय माहिती अधिकार संघटनेचे जिल्हा समन्वयक मिनार खोब्रागडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.



