*किसान विद्यालयात छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची १४९ वी जयंती साजरी*
जेप्रा: भारतीय आरक्षणाचे जनक, रयतेचे राजे, राधानगरी धरण प्रकल्पाचे जनक, बहुजन प्रतिपालक, उत्कृष्ट मल्ल पट्टू, लोकनायक, कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या १४९ व्या जयंतीनिमित्त अभिवादनपर किसान विद्यालय जेप्रा येथे आयोजित करण्यात आला होता.यावेळी महाराजांना पुष्पहार,फुले अर्पण करून त्यांचा नावाचा जयघोष करीत अभिवादन करण्यात आले.*

*अभिवादनपर कार्यक्रम सामजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी किसान विद्यालय जेप्राचे मुख्याध्यापक मुकुंद म्हशाखेत्री, शाळेचे सर्व शि़क्षकवृंद तथा विद्यार्थी उपस्थित होते.



