पतसंस्थेच्या अध्यक्ष्याच्या घरी चोरटयाचा डल्ला
* नागरिकात भीतीचे वातावरण *
* दागीने , रोख रक्कम लंपास *
सावली (लोकमत दुधे)
गेल्या काही दिवसांपासून व्याहाड खुर्द परिसरात विचित्र चोरीच्या घटना घडत आहेत. घरात शिरून चोरटे मिळेल ते खाऊन घरातील दागिने, रोख रक्कम लंपास करीत आहे. सातत्याने घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
येथे दीपक वासुदेव जवादे राहतात. विविध कार्यकारी सहकारी पतसंस्थेचे ते अध्यक्ष आहेत. १७ जून रोजी रात्री जेवण करून तळमजल्यावरील दारे, दिली. खिडक्या बंद करून पहिल्या मळ्यावर जवादे कुटुंब झोपण्यासाठी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता
दीपक जवादे यांची झोप उघडली. तळ मजल्यावर खाली उतरून पहिला, दुसरा दरवाजा उघडला. तिसरा दरवाजा उघडण्यास गेले मात्र तो आतून लावून होता. त्यामुळे ते घरामागील दरवाजाकडे गेले. तो दरवाजाही आतून बंद होता. त्यामुळे जवादे यांना शंका आली. त्यांनी खिडकीमधून बघितले. तेव्हा बेडवरील सामान अस्तव्यस्त पडून होते. र जवादे यांनी घरामागील दरवाजा उघडून खोलीत जावून बघितले. तेव्हा त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आली. त्यांनी पोलिसांना माहिती
पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. कपाटातून दीड तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र, चार ग्रॅमचे सोन्याचा
मंगळसूत्र, तीन ग्रॅमची कानातील बारी, दीड ग्रॅम कानातले लटकन, चार ग्रॅम सोन्याची अंगठी, तीस हजार ८५ हजार असा एकूण एक लाख ३१ हजार ७६३ रुपये लंपास केल्याचे निदर्शनास आले. चोरी करण्याआधी चोरट्यांनी घरातील जेवण, दुध, दही खाल्ले. भांड्यांची फेकफाक करून चोरटे पसार झाले. काही महिन्यापूर्वी व्याहाड येथील उपवनपरिक्षेत्र कार्यालयात अशाच पद्धतीने चोरी झाली. तिथे चोरांनी वनप्राण्याचे असलेले चामडे, नख पळविली. तेथे चोरट्यांनी स्वयंपाक केला. जेवण करून पसार झाले होते त्यामुळे या भागात चोरिच्या प्रमाणात वाढ झाली असून गावात भीतिचे वातावरण निर्माण झाले आहे …..



