द बॅनिंग कार
सिंदेवाही – पाथरी रोडवरती तांबेगडी मेंढा जवळ स्कार्पिओ गाडी जळाली, सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.
गडचिरोली कोंडेखल येथील स्कार्पिओ गाडी व प्रवाशी असल्याचा अंदाज आहे.
गडचिरोली कडून पाथरी मार्गाने सिंदेवाहीकडे स्कार्पिओ गाडीने तिनं व्यक्ती प्रवास करीत होती, अचानक चालू गाडी बंद पडली.
नंतर काही वेळातच पुर्ण गाडी लॉक झाली. त्यामुळे गाडीचे कोणतेही दार उघडले शक्य नव्हते. नशिबाने गाडीचा एक काच खुला होता.त्या खिडकीतून तिन्ही लोक गाडीबाहेर निघुन जिव वाचविला आहे. मात्र गाडी पूर्णपणे जळाली आहे.



